हिंगणघाट,
BJP नगराध्यक्ष तथा नगरसेवक गटातील भाजपा उमेदवारांना आता मित्रपक्ष लोक जनशती पार्टी (रा.) या पक्षाच्या वतीने पाठींबा देण्यात आला. जिल्ह्यात होऊ घातलेल्या सर्व नगरपालिका तसेच नगरपंचायती निवडणुकीतील भाजपा उमेदवारांकरिता घोषित करण्यात आला आहे.
केंद्रातील घटकपक्ष तथा मित्रपक्ष असलेल्या लोजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री चिराग पासवान तसेच प्रदेश अध्यक्ष सतिश लोणारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक आयोजित करून प्रदेश सचिव केशव तितरे, जिल्हाध्यक्ष डॉ आनंद जगताप यांनी आ. समीर कुणावार यांच्या उपस्थितीत पाठींब्याचा निर्णय जाहीर करीत पत्र प्रसिद्धीला दिले आहे.