भाजपाच्या चित्रा वाघ सिंदीत

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
सिंदीरेल्वे
Lok Janshakti Party support BJP स्थानिक पालिकेची निवडणूक रंगतदार होण्याची सुस्पष्ट चिन्ह दिसत आहे. त्यासाठी शनिवार २९ रोजी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ येथे मतदारांशी संपर्क साधणार आहे.
 

Lok Janshakti Party support BJP 
 
यंदा, नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कलोडे कुटुंबातील दोन महिलांमध्येच तीव्र संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. भाजपा उमेदवार राणी स्नेहल कलोडे यांचा मुकाबला शरद पवार गटाच्या सुनीता कलोडे करणार आहे. सुनीता कलोडे सन २९१४-१५ मध्ये नगराध्यक्ष होत्या. नऊ वर्षांनंतर होणार्‍या या निवडणुकीत डफ, तडस, झिलपे, चव्हाण परिवारातील दोन-दोन उमेदवार लढत आहेत. तसेच बेलखोडे आणि कलोडे आडनावांचे अनुक्रमे ३ आणि चार उमेदवार रिंगणात आहे. मागच्यावेळी कलोडे कुटुंबातील पाच उमेदवारांनी जनतेला कौल मागितला होता. पण पाचही उमेदवार पराभूत झाले होते, हे येथे उल्लेखनीय!
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश डफ आणि त्यांच्या सौभाग्यवती (अध्यक्षपद) तसेच दोनवेळा नगरसेवक राहिलेले आणि अर्धा डझन वेळा आपटी खाल्लेले काही हौशी उमेदवार स्पर्धेत आहेत. बुधवार २६ रोजी आ. समीर कुणावार दहाही प्रभागाचा दौरा करुन कॉर्नर सभा घेणार आहेत.