गुवाहाटीत कुलदीपवर पंत चिडला म्हणाला...video

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
गुवाहाटी
Pant got angry with Kuldeep गुवाहाटी कसोटीत भारतीय संघावर दबाव वाढत असतानाच दुसऱ्या दिवसाची सर्वात मोठी चर्चा ठरली ती कर्णधार ऋषभ पंतचा संताप. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटी सामन्यात स्टॉप-क्लॉक नियमाचे वारंवार उल्लंघन होत असल्याने पंत अनेकदा रागावलेला दिसला. विशेषतः स्पिनर कुलदीप यादवचा संथ षटक टाकण्याचा वेग पाहून पंत संतापला आणि त्याची नाराजी स्टंप माइकवर स्पष्ट ऐकू आली.
 
पंत ने खोया आपा
 
 
दुसऱ्या दिवशी ८८व्या षटकात भारताला वेळेची मर्यादा ओलांडल्याबद्दल पंच रिचर्ड केटलबरो यांनी दुसरी चेतावणी दिली. पहिल्याच दिवशी संघाला ओव्हर रेटसाठी पहिला इशारा मिळाल्याने ही परिस्थिती आणखी गंभीर ठरली. कुलदीपने चेंडू टाकण्यासाठी जास्त वेळ घेतल्याचे पाहून पंतने मागून कठोर शब्दांत फटकारले—“मित्रा, ३० सेकंदांचा टायमर आहे… तू कसोटी क्रिकेटची चेष्टा करतोयस का?” अशा स्वरात पंतची चिड स्पष्ट जाणवत होती. त्याचा हा रोखठोक सूर पाहून प्रेक्षकांना माजी कर्णधार रोहित शर्माच्या कडक नेतृत्वशैलीची आठवण झाली. आयसीसीचा स्टॉप-क्लॉक नियम कसोटी क्रिकेटमध्ये नुकताच सुरू झाला आहे. एका षटकानंतर पुढील षटक 60 सेकंदांत सुरू न झाल्यास संघाला इशारा मिळतो आणि तिसऱ्या उल्लंघनानंतर फलंदाजांना पाच धावांचा बोनस दिला जातो. त्यामुळे पंतचा अस्वस्थ होणे स्वाभाविक होते, कारण वारंवार होणाऱ्या चुका थेट संघाच्या स्थितीवर परिणाम करू शकतात.
 
 
 
 
या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेने मात्र सामन्यावर पकड अधिक मजबूत केली. सेनुरन मुथुस्वामीने प्रथम काइल व्हेरेनसह मोठी ८८ धावांची भागीदारी आणि त्यानंतर मार्को जॅन्सनसोबत ९७ धावांची भक्कम भागीदारी करून भारतावर प्रचंड दबाव आणला. मुथुस्वामीने आपले पहिले कसोटी शतक नोंदवत भारतीय गोलंदाजांना असहाय बनवले. जॅन्सननेही आक्रमक खेळ करत दोन गगनचुंबी षटकार लगावून भारतीय गोलंदाजांच्या योजना पूर्णपणे विस्कळीत केल्या. दक्षिण आफ्रिकेने अखेरीस पहिल्या डावात ४८९ धावा उभारल्या आणि सामना निर्णायक वळणावर नेला.