पवन मिश्रा यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार जाहीर

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड,
pawan mishra समाजासाठी निःस्वार्थ वृत्तीने, कोणत्याही अपेक्षेशिवाय सतत कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र लोकविकास मंच दरवर्षी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान करत असते. यावर्षी या मानाच्या पुरस्कारासाठी कारंजा तालुयातील लाडेगाव येथील पवनकुमार रामकिशन मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे.
 

pawan misra 
 
 
मंचाच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या पत्रानुसार समाजकार्यास संपूर्ण आयुष्य समर्पित करत, वंचित, दुर्बल आणि मागास घटकांसाठी सातत्याने काम करणार्‍या पवन मिश्रा यांच्या कार्याने अनेकांच्या जीवनात नवा प्रकाश, नवी आशा आणि नवी दिशा निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषी विकास, पर्यावरण आणि महिला-किशोरी सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी बजावलेली मोलाची भूमिका लक्षवेधी असल्याचे नमूद केले आहे. समाजपरिवर्तनाच्या वाटेवर दीपस्तंभाप्रमाणे उभे राहून मिश्रा यांनी अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणेचा स्रोत बनविले आहे. त्यांच्या संवेदनशील दृष्टीकोन, जबाबदारीची जाणीव आणि समाजकार्यासाठीची निष्ठा या गुणवत्तेचा आदर म्हणून २०२५ सालचा सामाजिक कार्य गौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दिलासा संस्था, घाटंजी, जि. यवतमाळ येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.pawan mishra या समारंभासाठी त्यांना सहकुटुंब, सहपरिवार तसेच सहकार्‍यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रातून करण्यात आले आहे.पवन मिश्रा यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.