स्मृती मंधानाच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही तब्येत खालावली

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
smriti-mandhana भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मंधानाचा विवाह सोहळा अचानक स्थगित करण्यात आला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे तिच्या वडिलांची प्रकृती बिघडणे. लग्नाच्या ठिकाणीच श्रीनिवास मंधाना यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्या, ज्यामुळे परिस्थिती गंभीर झाली.
 
smriti-mandhana
 
घटनेची माहिती मिळताच तातडीने एम्ब्युलन्स बोलावण्यात आली आणि त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, श्रीनिवास मंधाना यांना ‘एंजायना’चे लक्षण दिसले होते. तपासणीत त्यांचे कार्डियाक एन्झाइम्स वाढलेले आढळले असून सध्या त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. रक्तदाब वाढलेला असल्याने तो नियंत्रित करण्याचे उपचार सुरू आहेत. प्रकृतीत आणखी बिघाड झाल्यास एंजिओग्राफी करण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. या वैद्यकीय आणीबाणीमुळे विवाहसोहळ्याच्या सर्व तयारीला विराम देण्यात आला. smriti-mandhana स्मृती मंधानाने वडिलांच्या अनुपस्थितीत कोणतेही लग्नाचे विधी पुढे नेण्यास नकार दिला. संपूर्ण कुटुंब रुग्णालयाशी सातत्याने संपर्कात असून परिस्थिती स्थिर होण्याची वाट पाहत आहे.
दरम्यान, आणखी एक धक्का देणारी माहिती समोर आली आहे. स्मृती मंधानाचा होणार नवरा पलाश मुच्छल याची तब्येतही ढासळली असून त्यालाही रुग्णालयात दाखल करावे लागले. smriti-mandhana वायरल इन्फेक्शन आणि एसिडिटी वाढल्याने त्याला त्रास होऊ लागला. सुदैवाने त्याची स्थिती गंभीर नव्हती आणि उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन्ही कुटुंबांवर अचानक आलेल्या या वैद्यकीय संकटामुळे विवाहाच्या तारखेबाबत आता नव्याने निर्णय घेण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांचे लक्ष स्मृती मंधानाच्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याकडे लागले आहे.