तळेगाव (श्या.पंत),
Tiger sighting Taluka Ashti आष्टी तालुयातील बांबरडा शेत शिवारालगत असलेल्या बोटोणा येथे शेतात ओलित करीत असलेल्या सदाशिव इरखेडे या शेतकर्याला अचानक डोळ्यासमोर वाघ उभा पाहून आपण आता गेलो असा भास झाला. काही वेळाने वाघ निघून गेला. दरम्यान, शेतकरी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्यामुळे आता ओलित करावे की वाघ बघावा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
शेतकरी सदाशिव इरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात ओलित करण्यासाठी गेलो असता आपल्याला वाघ दिसला. काही वेळ काहीच सुचन नव्हते आणि विश्वासही बसत नव्हता. देवाकडे प्रार्थना केली देवा मला वाचव म्हणून मनात प्रार्थना करीत वाघ आणि आपण एक तास आमने सामने उभे राहिलो. आपल्याला काही वेळाने शुद्ध आली आणि गाव गाठत गावकर्यांना माहिती दिली. आष्टी तालुयातील सीमेवर कारंजा (घा.) तालुयाची सीमा लागून आहे. याच बोटोणा शेत शिवारात बोरखेडी, बांबरडा येथील शेतकर्यांची शेती आहे. या भागातून जांब नदी वाहत असल्यामुळे वाघ, अस्वल हे वन्य पाणी पिण्यासाठी फिरत असतात. त्यामुळे जीव मुठीत घेऊन शेतकरी, शेतमजूर कामं करतात. २३ रोजी सकाळी ७ वाजता वाघोबाने दर्शन दिले. त्यातून शेतकर्याची सुटका झाली. पण, भीती कायम आहे. या घटनेची माहिती ग्रापंचे माजी सदस्य शिलवंत ठाकरे यांनी वनविभाग तळेगाव यांना दिली. शेतात फिरणार्या वाघाला जेरबंद करून जंगलात सोडा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.