रेल्वेगाडीच्या धडकेत युवक जखमी

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
गोंदिया :
train accident Gondia रेल्वेगाडीच्या धडकेत एका युवकाचे दोन्ही पाय कपून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास तिरोडा येथील रेल्वे फाटक परीसरात घडली. राजेंद्र भाऊदास बोडणे (55) रा. खैरलांजी रोड तिरोडा असे जखमी युवकाचे नाव आहे.
 

train accident Gondia  
राजेंद्र हा हातमजुरीचे काम करीत असून घरात कमावणारा एकटाच आहे. रेल्वे रुळ ओलांडताना अचानक त्याच रुळावर वंदे भारत रेल्वेगाडी आल्याने रेल्वेगाडीच्या धडकेत त्याचे दोन्ही पाय धडा वेगळे झाले. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला देत त्याला गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. अधिक तपास रेल्वे पोलिस करीत आहेत