बॉलिवूडमध्ये शोककळा...दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन...अंत्यसंस्कार सुरू video

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Veteran actor Dharmendra passes away बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ वर्षी निधन झाले. ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीत आपले योगदान दिले. धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले आणि घरीच उपचार सुरू होते. आयएएनएसच्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांचे निधन झाले असून त्यांचे अंत्यसंस्कार पवन हंस स्मशानभूमीत केले जातील. दरम्यान त्यांचे कुटुंब आणि कलाकार पवन हंस स्मशानभूमीत पोहचणे सुरु झाले आहे. दरम्यान याबाबत अधिकृत घोषणा अद्याप होणे बाकी आहे,
 
 

Dharmendra passes away 
 
धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल आहे. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराणी गावात झाला. बऱ्याच दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु १० नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. संपूर्ण कुटुंब त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी, मुले सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, करण देओल, राजवीर देओल आणि अभय देओल यांनी त्यांना भेट दिली. त्याचबरोबर सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा आणि अमिषा पटेल यांनीही रुग्णालयात जाऊन अभिवादन केले.
 
 

dharmendra young 
 
 
धर्मेंद्र यांची अभिनय कारकीर्द १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटातून सुरू झाली. ‘बॉयफ्रेंड’ (१९६१) पासून ते ‘शोले’ (१९७५), ‘चुपके चुपके’ (१९७५), ‘सीता और गीता’ (१९७२), ‘धरमवीर’ (१९७७), ‘फूल और पत्थर’ (१९६६), ‘जुगनू’ (१९७३) आणि ‘यादों की बारात’ (१९७३) यासह अनेक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी काम केले. २०२३ मध्ये आलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये त्यांच्या शबाना आझमींसोबतच्या किसिंग सीनमुळे त्यांची खूप चर्चा झाली. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटातही त्यांचा सहभाग राहिला. धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ वर्षीही काम सुरू ठेवले. त्यांच्या निधनानंतर, त्यांचा शेवटचा चित्रपट ‘एक्किश’ या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ते अगस्त्य नंदाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्यही विशेष महत्वाचे आहे.