अ‍ॅग्रोव्हिजनचे कार्यक्रम आता वर्षभर

-केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रतिपादन -अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा थाटात समारोप -चार दिवसात लाखों शेतकऱ्यांनी भेट

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
नागपूर,
agrovision वार्षिक कृषी प्रदर्शन व ज्ञानवर्धक परिषदा, चर्चासत्रांनी परिपूर्ण अ‍ॅग्रोव्हिजनचे कार्यक्रम आता वर्षभर होणार व शक्य झाल्यास पुढील वर्षी अमरावती रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ग्राउंडवर तयार होत असलेल्या कन्व्हेंशन सेंटरमध्ये अ‍ॅॅग्रोव्हिजन आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
चार दिवसीय अ‍ॅग्रोव्हिजनच्या समारोपात ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री आशीष जैसवाल, सिने अभिनेते प्रवीण तरडे, अ‍ॅग्रोव्हिजनचे आयोजन सचिव रवी बोरटकर, अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे सल्लागार डॉ. सी. डी. मायी, पीडीकेव्ही अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, माफसुचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, गिरीश गांधी, अशोक मानकर, रमेश मानकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 

ऍग्रोव्हिसिओन  
 
 
 
प्रारंभी रवी बोरटकर यांनी 4 दिवसातील वैशिष्ट्यपूर्ण बाबी व सामंजस्य करार यासह विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर ‘अ‍ॅग्रो स्पेक्ट्रम’चे प्रकाशन करण्यात आले. यंदाच्या अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये मोठ्या प्रमाणात युवावर्गाने रस घेतला. दररोज हजारो युवकांनी भेट दिली. सव्वा लाख शेतकऱ्यांसह विविध संशोधक उत्पादनकर्ते, कंपन्या व कृषी संबंधित व्यावसायिकांनी भेट दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 16 व्या वर्षात मागे वळून पाहताना गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये कपात, विदर्भात शेतीपूरक उद्योगांमध्ये वाढ, एनडीडीबीच्या विदर्भातील कार्यामुळे दूध उत्पादनाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून विकास, इतर शेती व जोडधंद्यांमध्ये वाढ झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्पेनमध्ये ज्या धरतीवर लिंबूवर्गीय फळांची लागवड केली जाते व संत्रा तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे त्याच धर्तीवर विदर्भातील शेकèयांना संत्रा तंत्रज्ञान देण्याच्या प्रयत्नानाचा त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर, आभार प्रदर्शन डॉ. सी.डी. मायी यांनी केले.
-शेतकरी पुरस्कार
उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना अ‍ॅग्रोव्हिजन शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात यवतमाळमधील दुग्ध उत्पादनसाठी नरसिंह थावरा जाधव, संतरा पिकासाठी अजिंक्य दिगंबर तिडके, कृषिपूरक व्यवसाय व भात शेतीसाठी वंदना वैद्य, शेतकरी जागृती व कृषी पूरक व्यवसायासाठी अशोकराव शिवराम वानखेडे, बचत गट प्रकारात जितेंद्रसिंह गोराम यांचा सत्कार करण्यात आला. प्रयोजकांचाही सत्कार करण्यात आला.
-रस्ते सुरक्षाविषयक पथनाट्यः अ‍ॅॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या समारोपा आधी जनआक्रोश- फॉर बेटर टुमारो या संस्थेतर्फे रस्ते अपघाताची प्रमुख कारणे यावर एसएफएस महाविद्यालयाच्या सोळा विद्यार्थ्यांनी दहा मिनिटांच्या पथनाट्याचे सादरीकरण केले. रवींद्र कासखेडीकर व चमू उपस्थित होती.