रुग्णवाहिकेअभावी ओल्या बाळंतिणीची दोन किलोमीटर पायपीट

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
मोखाडा,
Balantini's two kilometer walk एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यावर सोडल्यामुळे तिला बाळासहित दोन किलोमीटर पायपीट करावी लागली. मोखाडा तालुक्यातील आमले येथील सविता बारात हिला (सासरचे नाव सविता मनोज बांबरे) १९ नोव्हेंबर रोजी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले गेले होते. प्रसूती नंतर पुढील उपचारासाठी तिला जव्हार कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले होते आणि तिची प्रसूती सुखरूप झाली.
 
 
two kilometer walk
रविवार, २४ नोव्हेंबर रोजी रुग्णवाहिकेद्वारे सविताला घरी पाठविण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका चालकाने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना उतरवून गाडी निघून गेली. प्रसूत महिलेशी तिची आई आणि सासूही होत्या. या परिस्थितीत तिला बाळासह दोन किलोमीटर पायपीट करावी लागली. या घटनेवर सविताचा पती मनोज बांबरे म्हणाला की, रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच आम्हाला सोडले, त्यामुळे दोन किलोमीटर चालावे लागले. सुरुवातीला आम्हाला खोडाळापर्यंत सोडण्याची सूचना दिली गेली, तिथे पीएसीचे वाहन नसल्याने आमले फाट्यापर्यंत जावे लागले.
वाहनचालकाने विचारले की घरापर्यंत सोडू का, आम्ही सांगितले की रस्ता लहान आहे आणि गाडी वळू शकत नाही, त्यामुळे आमले फाट्यावर सोडले. जव्हार कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय कावळे यांनी सांगितले की, ही घटना गंभीर आहे आणि रुग्णवाहिकेच्या सेवेत सुधारणा आवश्यक आहे. कुटुंबीयांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला असून संबंधित चालकाविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.