पुलगावात २४ लाखांची रोकड पकडली

*पैसे कापूस विक्रेत्याचे असल्याचे पुरावे सादर *स्थिर निगराणी पथकाची कारवाई

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
पुलगाव, 
Cash seized in Pulgaon : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी आचारसंहितेचे पालन करण्याच्या उद्देशाने नपच्या सिमांवर स्थिर निगराणी पथक तैनाद करण्यात आले आहे. येथे स्थिर निगराणी पथकाने कारची पाहणी केली असता त्यात २४ लाखांची रोकड मिळून आली. पोलिसांनी ती ताब्यात घेतली.
 
 
lkl
 
 
 
स्थिर निगराणी व भरारी पथकांच्या माध्यमातून नगर पालिका निवडणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत कायर्वाही केली जात आहे. अमली पदार्थ, रोख रक्कम आदीची नियमबाह्य वाहतूक करणार्‍यांवर या पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. पुलगाव येथील राजीव गांधी उद्यान परिसरात असलेल्या स्थिर निगराणी पथकाने एम. एच. ३२ एस. ४१२१ क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यात २४ लाख रुपये आढळून आले. यात ५०० रुपयांच्या ३६७७ नोटा, २०० रुपयांच्या १६२७ नोटा, १०० रुपयांच्या १३१६ नोटा, ५० रुपयांच्या २२५ नोटा व २० व १० रुपयांची प्रत्येकी एक नोट अशी २४ लाख ६ हजार ७८० रुपयांची रोकड जप्त केली. ही कार अमन चौधरी हे चालवित होते. तर त्यांच्या बाजूला मयंक चौधरी बसून होते असे सांगण्यात आले.
 
 
जिल्ह्यातील ६ नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीच्या अनुषंगाने २८ स्थिर निगराणी पथक तर ११ भरारी पथकांच्या माध्यमातून शहरांतील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. मोठ्या प्रमाणात रोख कारमध्ये मिळून आल्यावर स्थिर निगराणी पथकातील अधिकार्‍यांनी कारमधील दोघांकडे रोकडबाबत अधिकची चौकशी केली. प्राथमिक चौकशीत ही रक्कम जय भवानी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग शिरपूर (हुस्नापुर)ची असल्याचे पुढे आले आहे. शेतकरी कापूस विकायला येतात, ज्यांना काहींना रोख व काहींना ऑनलाइन पैसे दिले जातात. कारमधील दोघांनी पुलगावच्या नाचणगाव मार्गावरील गणेशनगर येथील एचडीएफसी बँकेतून १४ रोजी २५ लाख, १७ नोव्हेंबरला २० लाख आणि १९ नोव्हेंबरला १५ लाखांची रोख काढल्याची माहिती दिली. संबंधित चेक नंबर आणि दस्तऐवज देखील त्यांनी अधिकार्‍यांना दिले.