शत्रूला विकल्या गेलेल्या अर्धवट विद्वानांपासून सावध व्हा

*चारुदत्त आफळे

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
हिंगणघाट, 
charudatta-afale : सध्या आपल्या देशात हिंदुत्वद्वेषाची लाट निर्माण झाली असून ते अर्धवट विद्वान देशभत राष्ट्रवादी विचारांच्या व्यती व संघटनांची बदनामी करून राष्ट्रविरोधी शतींना मदत करीत आहे. त्यामुळे समाजाने सजग राहून सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचे चिंतन मनन करण्याची आज खरी गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.
 

afale 
 
ते संस्कार भारती हिंगणघाट शाखेच्या वतीने एसएसएम मोहता विद्यालयात आयोजित कीर्तन महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशीचे पुष्प गुंफताना बोलत होते.
 
 
यावेळी आफळे यांनी देव आणि राष्ट्र यासाठी स्वा. सावरकर व सुभाषचंद्र बोस यांनी भोगलेल्या हालअपेष्टाचे हृदयस्पर्शी वर्णन केले. सावरकर यांनी अंदमान येथील तुरुंगवास ही आपत्ती ऐवजी संधी समजून तुरुंगातील हिंदू कैद्यांमधील जातीयता, अंधश्रद्धा दूर करून त्यांना सुशिक्षितच नव्हे सुसंस्कृत केल्याने सन १९४७ नंतर केवळ अखंड अंदमान हिंदुस्थानला मिळाले हे सावरकरांचे देशावर उपकार असल्याचे ते म्हणाले. सावरकरांनी आयुष्यात कधीही स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही तर केवळ निर्मळ मनाचा हिंदू समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
 
 
आपण प्रत्येकाने विलगतेची भाषा करू नये याची शिकवण सावरकर यांनी आपल्या आचरणातून दिली. समाजाच्या सृजनरक्षणाचे कार्य सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांनी मोठ्या प्रमाणात करून या देशावर अनंत उपकार करून ठेवले तरीही देश स्वतंत्र होण्यासाठी या देशातील प्रत्येक घटकांचे योगदान तेवढेच महत्त्वपूर्ण असल्यामुळे कोण्या एका व्यक्तीमुळे नाही तर सर्व घटकांच्या प्रयत्नाने मिळालेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी समग्र समाजाची असल्याचे त्यांनी कळकळीची विनंती केली.
 
 
प्रास्ताविक संजय देशपांडे यांनी करून आभार मानले. यावेळी संस्कार भारतीचे मार्गदर्शक रमेश धारकर, श्रद्धा कुणावार, सावरकर स्मारक समिती वर्धाचे अध्यक्ष श्याम देशपांडे, वर्धा नागरी बँकेचे उपाध्यक्ष मंगेश परसोडकर, मकरंद उमाळकर, हिंगणघाटचे अशोक सोरटे, आदींसह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
तीन दिवशीय व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी पराग आजनसरे, डॉ. मोहन खेतलं, मिलिंद सावरकर, विजय गावंडे, अमोल झाडे, रमाकांत गायकवाड, हरिदास पाल, योगेश हेंडावू, लोकेश माशलकर, सुवर्णा देशपांडे, निवेदिता वझलवार, वैशाली खेतलं, वर्षा आजनसरे यांनी परिश्रम घेतले.