जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात पिक विम्यासाठी शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
बुलढाणा, 
Crop Insurance-Farmers Protest : मलकापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना पिक विमा मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या दसरखेड बेलाड देवधाबा नरवेल हरसोडा या गावातील शेतकर्‍यांनी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हा कृषी अधिक्षक मनोजकुमार ढगे यांच्या समोर तक्रारी करून ठिय्या आंदोलन केले.
 
 
 
protest
 
 
 
शेतकर्‍यांना पिकविमा मिळण्यासाठी मंजूर झालेल्या ११० टक्के मंजूरीवर कंपनीमार्फत शासनामार्फत विमा रक्कम दिल्या जाते. ठिय्या आंदेालन करणार्‍या शेतकर्‍यांनी विम्याच्या पावत्या जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात दिल्या आहेत. यासंदर्भात कृषी विभागामार्फत तपासणी करून ११० टक्के मंजूर रकमे वरचा विमा परतावा शासनाकडून मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या ३० ते ४० शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दिल्या आहेत.