मुंबई,
E-KYC mandatory for women महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत सहभागी होणार्या महिलांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले गेले आहे. जे लाडक्या बहिणींनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा उद्देश फक्त पात्र महिलांपर्यंत आर्थिक मदत पोहचवणे आणि योजनेत पारदर्शकता राखणे आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. काही महिलांना तांत्रिक अडचणी, पूरजन्य परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे केवायसी करण्यात अडथळे आले होते, म्हणून सरकारने मुदत वाढवली आहे. मात्र, आता या मुदतीनंतर जे महिला केवायसी पूर्ण करणार नाहीत, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

केवायसी करण्यासाठी महिलांनी आधार कार्ड वापरून ऑनलाइन प्रक्रिया पार पाडावी लागेल. सर्वात प्रथम
https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन ई-केवायसी सेक्शनमध्ये प्रवेश करावा लागेल. येथे आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकल्यावर, केवायसी पूर्ण असल्यास पुष्टी संदेश मिळेल. जर पूर्ण नसेल तर पुढील प्रोसेस करताना वडिलांचे किंवा पतीचे आधार नंबर टाकून काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यानंतर केवायसी पूर्ण होईल. सरकारचा उद्देश योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहचवणे आणि बनावट कागदपत्रांमुळे होणाऱ्या गैरसोयी टाळणे आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता फक्त त्याच लाडक्या बहिणींना दिला जाईल, जे ई-केवायसी पूर्ण करतील.