तभा वृत्तसेवा
आर्णी,
farmer-dies : पारवा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा या ग्रामीण भागातील दातोडी गावातील शेतशिवारात रात्री शेतात जागरण करणाèया एका शेतकèयाचा मळ्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार,25 नोव्हेंबर सकाळी उघडकीस आली.
मृतक शेतकèयाचे नाव सीताराम डोमा पवार (वय 60, माळेगाव) असे आहे. मृतक पवार यांचा नातू दातोडी येथील नदीकाठी असलेले ईसाजी ठाकरे यांचे शेत रबी पिकासाठी मक्त्याने घेतले होते. त्या शेतात रात्री पिकांचे रक्षण करण्यासाठी जागरणासाठी सिताराम पवार हे मळ्यावर झोपले होते. दरम्यान, सकाळी ते मळ्यावरून खाली पडलेल्या अवस्थेत मृत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच सावळीसदोबा पोलिस दूरक्षेत्रातील ठाणेदार बास्टेवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनेचा पुढील तपास पारवा पोलिस करीत आहेत.