वर्धेत पाच दिवसीय लायन्स फेस्टिव्हल एस्पो

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
Lions Festival Espoo : वर्धेला व्यवसाय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक नवीन ओळख देणे, स्थानिक उद्योजक, कलाकार आणि तरुणांना त्यांचे कौशल्य आणि उत्पादने समाजासमोर सादर करण्यासाठी लायन्स लब वर्धा लेजेंड्सच्या वतीने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान लायन्स फेस्टिव्हल अ‍ॅण्ड एस्पो २०२५ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती लायन्स लब वर्धा लेजेंड्सचे अध्यक्ष वरुण पांडे यांनी आज २५ रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 

jkj 
 
 
 
लायन्स लब वर्धा लेजेंड्स आणि लायन्स लब नागपूर निर्मिक यांच्या वतीने स्थानिक लोक महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या एसपोचे उद्घाटन माजी खासदार दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होईल. दररोज वेगवेगळे मान्यवर या एस्पोला भेटी देणार आहेत. महाराष्ट्र स्तरावरील फॅशन शो हे या महोत्सवाचे मोठे आकर्षण राहणार आहे. फॅशन शो स्पर्धेतील विजेत्यांना मिस्टर महाराष्ट्र लेजेंड्स आणि मिस महाराष्ट्र लेजेंड्स हे किताब दिले जाईल. याव्यतिरित देशभरातील नृत्य गट राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत त्यांची प्रतिभा दाखवणार आहेत. या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेसाठी प्रत्येक राज्यातील कलाकार या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहितीही पांडे यांनी दिली.
 
 
या महोत्सवात नागरिकांना कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्यासाठी तसेच खाद्यप्रेमींसाठी स्वादिष्ट पदार्थांची मेजवाणी मिळणार आहे. महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात आले असून विविध खाद्य पदार्थांचे ९० स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहितीही वरुण पांडे यांनी दिली. यावेळी अमोल कठाणे, सूरज राईकवार आणि शुभम राऊत यांची उपस्थिती होती.
 
 
अमृता फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान
 
 
या महोत्सवादरम्यान १ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास फॅशन शो आणि मॉडलिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल सायंकाळी जाहीर होणार असून विजेत्या स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते मिस्टर महाराष्ट्र लेजेंड्स आणि मिस महाराष्ट्र लेजेंड्सचा किताब दिल्या जाणार आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, शितल भोयर यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.