गुंज येथील जिनिंगमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू

शेतकऱ्यांसाठी नोंदणी आणि ‘बुक स्लॉट’ करणे अनिवार्य

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव, 
cci-cotton : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सिसीआय) यांच्यामार्फत कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली असून कृषी उत्पन्न बाजार समिती महागावच्या वतीने गुंज येथील जिनिंगवर खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे.
 
 
 
kapus
 
 
 
शेतकèयाचा कापूस हमी भावाने खरेदी करण्यासाठी सीसीआयच्या वतीने कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत गुंज येथील मनजीत जिनिंग येथे कापूस खरेदी करणे सुरू करण्यात आले आहे. खरेदीचा लाभ घेण्यासाठी सर्व कापूस उत्पादक शेतकèयांनी ‘कापूस किसान’ अ‍ॅपवर किंवा 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन, नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
 
 
शेतकèयांनी ‘कापूस किसान’ अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतर, सीसीआय मार्फत ‘अप्रूव्हड’ मेसेज मिळाल्यावरच, शेतकèयांना कापूस विक्रीसाठी ‘कापूस किसान’ अ‍ॅपमध्ये जाऊन आपला ‘स्लॉट बुक’ करण्याची परवानगी मिळेल. कापूस विकणाèया शेतकèयांनी स्वतः सोबत फेरवळी (8 अ) व सातबारा, आधार कार्ड, आणि मोबाईल घेऊन येणे बंधनकारक आहे.
 
 
शेतकèयांनी चांगल्या दर्जाचा स्वच्छ कापूस विक्रीसाठी आणावा. कापसामध्ये कवड, फटकळ, कोळप, खराब झालेला कापूस स्वीकारला जाणार नाही. तसेच 8 ते 12 आर्द्रतेवरील कापूस स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे शेतकèयांनी याची दक्षता घेऊन आपला कापुस खरेदी केंद्रावर आणावे, असे आवाहन कृउ बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.