अयोध्या,
Historic flag hoisting at Ram temple अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ध्वजारोहण केले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी राम लल्ला येथे भेट देऊन राम दरबारात प्रार्थना केली. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी व संघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंदिराच्या शिखरावर धार्मिक समारंभ पार पडताच ध्वजारोहण केले. या ऐतिहासिक प्रसंगात भाविकांच्या उत्साहाला चालना मिळाली, तसेच मंदिर परिसरात शांत आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळाले.