नवी दिल्ली,
India to China अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय महिलेला चीनच्या राजधानी शांघायमधील पुडोंग विमानतळावर ताब्यात ठेवण्यात आले. तिला चिनी अधिकाऱ्यांनी १८ तासांहून अधिक काळ ताब्यात ठेवले, तिचा पासपोर्ट अवैध असल्याचा दावा केला आणि अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचे सांगितले. ही घटना महिला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली, ज्यावरून भारताने चीनकडे तातडीने तीव्र प्रत्युत्तर दिले. भारताने या घटनेचा निषेध नोंदवून चिनी दूतावासाला अधिकृत निवेदन दिले आहे. भारताने स्पष्ट केले की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि चीनचे दावे निराधार आहेत. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याचे दिसून आले आहे. भारताने चीनच्या कृतींवर तीव्र आक्षेप घेतला असून, अशा प्रकारची वागणूक भविष्यात पुन्हा होणार नाही याची हमी मागितली आहे.
घटनेनंतर भारतीय वाणिज्य दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर महिलेला रात्री उशिरा तिचा प्रवास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. भारताने चीनच्या या कृतीला आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक नियमांचे, विशेषतः शिकागो आणि मॉन्ट्रियल अधिवेशनांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाबाबत सांगायचे झाले तर, शांघाय पुडोंग विमानतळावर ट्रान्झिट स्टॉप दरम्यान भारतीय महिलेला चिनी अधिकाऱ्यांनी थांबवले आणि आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. महिला यांनी आपला व्हिसा आणि पासपोर्ट दाखवला, परंतु अधिकाऱ्यांनी तिची विनंती स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी, तिला १८ तासांहून अधिक काळ ताब्यात ठेवण्यात आले.