बीजिंग,
India's illegal occupation of Arunachal चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा पुन्हा मांडला असून, भारताच्या कन्येशी झालेल्या कथित गैरवर्तनाचा खंडन केले आहे. मंगळवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय महिला प्रवाश्याशी छळ किंवा गैरवर्तन झाल्याच्या वृत्तांना पूर्णपणे नाकारले. मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, माओ निंग यांनी चीनच्या दीर्घकाळाच्या दाव्याचा पुनरुच्चार करत सांगितले की, झांगनान (जगननान) हा चीनचा भूभाग आहे, तर भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या अरुणाचल प्रदेशला चीनने कधीही मान्यता दिलेली नाही.

तसेच महिलेला ताब्यात घेण्यात आले नाही, कोणतीही अनावश्यक कारवाई झाली नाही किंवा छळ करण्यात आलेला नाही. सीमा अधिकाऱ्यांनी पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून काम केले असून एअरलाइनने तिला शौचालय, अन्न व पाणी पुरवले. संपूर्ण प्रकरण २१ नोव्हेंबर रोजी घडले, जेव्हा लंडन, थोंगडोक येथे राहणारी भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक पेमा वांगजोम लंडनहून जपानकडे प्रवास करत होती. शांघायमध्ये तिचा तीन तासांचा ट्रान्झिट थांबा १८ तासांचा बनवण्यात आला. चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिचा पासपोर्ट "अवैध" घोषित केला कारण त्यात अरुणाचल प्रदेश तिचे जन्मस्थान म्हणून नमूद होते. यानंतर पेमा यांनी सोशल मीडियावर घटनांविषयी पोस्ट्स केल्या.
भारताने या घटनेवर तीव्र आक्षेप नोंदवला असून बीजिंगकडे निषेध नोंदवला. भारताचे म्हणणे आहे की, शांघाय पुडोंग विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील भारतीय नागरिक प्रवाश्याशी केलेली ही कृती पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हे अटक “अविवेकी कारणांवर” आधारित होती आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे; या प्रदेशातील नागरिकांना भारतीय पासपोर्ट बाळगण्याचा आणि प्रवास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारताने असेही स्पष्ट केले की, चिनी अधिकाऱ्यांची ही कृती आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक नियमांचे (शिकागो कन्व्हेन्शन आणि मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन) उल्लंघन आहे आणि अशा कृतींमुळे दोन्ही देशांमधील संबंध स्थिर करण्याच्या प्रयत्नांना अनावश्यक अडथळा येतो.