उद्योग व्यवसाय वाढीसाठी एक खिडकी योजना राबवा

एयू कॉर्पोरेट आणि कायदेशीर सल्लागार सेवा लिमिटेडचे संस्थापक अक्षत खेतान यांची मागणी

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
नागपूर,
akshat-khaitan : आपल्या देशाचे आर्थिक धोरणे प्रतिबंधात्मक नसून सर्वसमावेशक आणि उद्योग व्यवसाय वाढीवर असली पाहिजेत, जेणेकरून उद्योगांना भरभराटीचे दिवस बघायला मिळतील. केंद्र सरकारने उद्योग व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी एक खिडकी योजना राबवावी, अशी सुचना एयू कॉर्पोरेट आणि कायदेशीर सल्लागार सेवा लिमिटेडचे संस्थापक अक्षत खेतान यांनी पुढाकार घेतला आहे.
 
 
akshat-khetan
मुख्यत: उद्योग व्यवसायात कार्यरत असलेल्या उद्योजकांनी ऑनलाइनव्दारे कोणतेही व्यवहार करताना सर्वाधिक दक्षता गरज आहे. गत काही वर्षात देशभरात सायबर गुन्हेगारीचे प्रकरणे वाढली आहे. यापासून बचाव करण्यासाठी एयू कॉर्पोरेट आणि कायदेशीर सल्लागार सेवा लिमिटेडच्या वतीने मार्गदर्शन केल्या जात आहे. गत ५ वर्षात देशभरातील ९५० कंपण्यांना प्रत्यक्षात मार्गदर्शन केल्याने लाभ झाला असल्याचे अक्षत खेतान यांनी सांगितले.
 
 
कॉर्पोरेट आणि कायदेशीर सल्लागार क्षेत्रात कार्यरत अक्षत यांचे मार्गदर्शन उद्योग व्यवसायाला पुरक ठरत आहे. उद्योगाचे धोरण, विलीनीकरण आणि अधिग्रहण, आर्थिक सल्लागार, कर्ज सिंडिकेशन, दिवाळखोरी व्यवस्थापन आणि खटले सेवा पुरविल्या जात आहे. कंपणीकडे फसवणूकीचे प्रकरणे येतात. याशिवाय व्हाईट-कॉलर गुन्हे, बँकिंग खटले, करविषयक बाबी, वाद निराकरण यावर सल्ला देण्यासाठी तज्ञमंडळी आहेत.