केकेआरचे माजी प्रशिक्षक कार्ल क्रो आता एलएसजीकडे

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Karl Crowe now to LSG आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्सने मोठा पाऊल उचलत कार्ल क्रो यांना फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात समाविष्ट केले आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील एलएसजीने मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केले की कार्ल डॅनियल क्रो आगामी हंगामात फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत.
 
 
carl crowe lsg
 
कार्ल क्रो पूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससाठी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. इंग्लंडच्या कार्ल क्रोने कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही, परंतु त्यांनी ४२ प्रथम श्रेणी सामन्यांत ६० बळी आणि ४० लिस्ट ए सामन्यांत ३३ बळी घेतले आहेत. त्यांनी एक टी-२० सामना देखील खेळला, जिथे त्यांनी फक्त ९ धावा केल्या. आज त्यांचा ५० वा वाढदिवस आहे.
 
एलएसजीच्या प्रशिक्षक विभागात टॉम मूडी क्रिकेट संचालक, केन विल्यमसन रणनीतिक सल्लागार, जस्टिन लँगर प्रशिक्षक, लान्स क्लुजनर सहाय्यक प्रशिक्षक, भरत अरुण बॉलिंग प्रशिक्षक आणि कार्ल क्रो स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. लिलावात लखनौला सहा खेळाडू खरेदी करावे लागतील. एलएसजीने आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत (२७ कोटी रुपये) यासह १९ खेळाडूंना कायम ठेवले असून संघात चार परदेशी खेळाडूंची जागा रिक्त आहे. लिलावासाठी एलएसजीकडे ₹२२.९५ कोटी शिल्लक आहेत.