वर्धा,
charudatta-afale : प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कीर्तनकार चारुदत्त आफळे महाराज यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन दर्शन घेतले.
याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे संकल्पक श्याम देशपांडे, संस्कार भारतीचे प्रांत पदाधिकारी मंगेश परसोडकर, मनोज भांडवलकर, मिलिंद तायवडे, चिंतामणी निमकर आणि प्रमोद रंगारी उपस्थित होते.
बाल मानसशास्त्र, समाज मानसशास्त्र लक्षात घेता एखाद्या कार्यक्रमांमध्ये थोर पुरुषांचे चरित्र ऐकून घेण्यापेक्षा चित्राच्या माध्यमातून प्रसंगोचीत चित्र आणि त्याला अनुसरून त्याच्या बाजूला इतिहास हा मनावर आणि बुद्धिवर अधिक परिणामकारक आणि प्रभावी ठरतो. आणि या सूत्रातून वर्धा नगरीतील स्वा. सावरकरांचे स्मारक एक अभूतपूर्व स्मारक असून त्याचे दर्शन घेण्याचा योग मला प्राप्त झाला हे माझे भाग्यच होय, असे मत येथील सावरकर स्मारकाचे दर्शन घेताना चारुदत्त आफळे यांनी व्यत केले.
आरंभी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी संपूर्ण स्मारकातील भितीचित्राचे सूक्ष्म निरीक्षण करून आपली प्रतिक्रिया व्यत केली.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचे स्तोत्र जे सर्व जगाला प्रेरणादायी आहे, असे स्तोत्र देणार्या सावरकरांचे साहित्य आणि जीवन हे थक करून सोडणारे आहे. स्वातंत्र्यातील त्यांच्या त्यागमय चरित्राचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सावरकरांचे सतत स्मरण होत राहण्यासाठी हे स्मारक खरोखरच अलौकिक आहे.
भारतात सावरकरांची अनेक ठिकाणी स्मारके आहेत पण, हे स्मारक पाहून प्रसन्नता, धन्यता आणि कृतार्थतेचा अनुभव मी अनुभवला असल्याचेही ते म्हणाले. सर्व देशभतांनी आग्रहाने येऊन हे स्मारक पहावे, कारण सावरकरांविषयी असणारे अनेक गैरसमज या स्मारकातील माहितीवरून दूर झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही चारुदत्त आफळे यांनी व्यत केला.
यावेळी स्वा. सावरकर स्मारकाच्या वतीने चारुदत्त आफळे यांना स्मारकाची स्मरणिका देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.