मेष्टाचा डॉ. नयना तुळसकर यांना पाठिंबा

*आ. कुणावार यांना दिले सक्रीय पाठिंब्याचे पत्र

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
हिंगणघाट,
nayana-tulskar : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन म्हणजेच मेष्टा या संघटनेने आ. समीर कुणावार यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन नप निवडणुकीत भाजपा उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर विभागाचे उपाध्यक्ष जयंत भोयर यांनी आपले समर्थन जाहीर करीत आ. कुणावार यांना पाठींब्याचे पत्र दिले.

meshta 
 
मेष्टाचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी आ. कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन नप निवडणुकीत भाजपा उमेदवारांना तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. नयना तुळसकर यांना पाठिंबा घोषित केला आहे. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते किशोर दिघे, प्रा. डॉ. उमेश तुळसकर, संदीप सरोदे, प्रा. डॉ. वासुदेव चौधरी, रमेश राठी , प्रा. अजय यादव, अजय फुलझेले, अनिल मडावी, अनिल मोहता आदी उपस्थित होते.