मोदी सरकारचा डिजिटल स्ट्राइक: २१ लाख मोबाईल क्रमांकांवर धडक कारवाई

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Modi government's digital strike मोदी सरकारने डिजिटल फसवणुकीविरुद्ध मोठा दणका दिला असून, २१ लाखांहून अधिक मोबाईल क्रमांकांवर धडक कारवाई केली आहे. अनेकदा मोबाईल युजर्सना ओळखीचे नसलेले कॉल किंवा अनवधानाने मेसेज येतात, जे फसवणूक किंवा स्पॅमच्या स्वरूपाचे असतात. अशा सर्व फसवे कॉल आणि मेसेज पाठवणाऱ्यांविरुद्ध भारतातील टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (TRAI) ने गेल्या वर्षभरात मोठी कारवाई केली आहे.

Narendra Modi
TRAI च्या माहितीनुसार, या कारवाईअंतर्गत २१ लाखाहून अधिक क्रमांक हंद केले गेले आहेत, जे सातत्याने फसवे मेसेज पाठवत होते. या फसवणूक प्रकरणामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात असल्यामुळे मोदी सरकारकडून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई TRAI च्या अधिकृत DND App द्वारे करण्यात आली असून, नागरिक आता या अॅपच्या माध्यमातून फसवे कॉल आणि मेसेज रिपोर्ट करू शकतात. यामुळे क्रमांक फक्त युजरच्या फोनवर ब्लॉक न करता कायमस्वरुपी बंद केला जातो आणि त्याची पडताळणी करून पुढील फसवणूक थांबवली जाते.
 
 
TRAI ने नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी TRAI DND App डाऊनलोड करावे आणि फसवे कॉल किंवा मेसेज आल्यास त्याची नोंद या अॅपमध्ये करावी. तसेच बँकेची माहिती, OTP किंवा अन्य खासगी माहिती मेसेज किंवा सोशल मीडिया चॅटवर ठेवू नयेत, असा इशारा TRAI ने दिला आहे. कोणत्याही धमकीवजा कॉलसाठी फोन कट करावा आणि त्या क्रमांकाची माहिती TRAI कडे द्यावी. सायबर फसवणूक झाल्यास १९३० या देशव्यापी सायबर क्राईम हेल्पलाइनवर तातडीने संपर्क साधावा किंवा Chakshu/चक्षू फिचर वापरून संशयास्पद टेलिकॉम हालचालींची तक्रार नोंदवावी, असे TRAI ने स्पष्ट केले आहे.