मेरठ,
Muskan gave birth to a baby in jail उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील सौरभ राजपूत हत्याकांडातील आरोपी मुस्कान रस्तोगीने सोमवारी एका मुलीला जन्म दिला आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार आई आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर आहे. रविवारी रात्री मुस्कानच्या पोटात अचानक दुखायला लागल्यामुळे तिला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी ६.५० वाजता तिने मुलीला जन्म दिला. या मुलीचा जन्म विशेष ठरतो, कारण २४ नोव्हेंबर हा सौरभ राजपूतचा वाढदिवस असून, मुस्कानने त्याच दिवशी बाळाला जन्म दिला आहे.
मुस्कानची ही पहिली मुलगी सध्या सौरभच्या आई-वडिलांकडे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांनी सौरभ राजपूत यांची हत्या केली आणि मृतदेह निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरण उघडकीस आल्यावर दोघांना तातडीने अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
सौरभचा मोठा भाऊ राहुल म्हणाला की, बाळाची DNA चाचणी करून ते पाहणार आहेत की बाळ सौरभचे आहे का. चाचणी नंतर जर बाळ खऱ्या अर्थाने सौरभचे असल्याचे सिद्ध झाले तर ते बाळाची जबाबदारी स्वीकारतील. मुस्कानला अटक झाल्यानंतर तिचा गर्भ असल्याचे समोर आले. सध्या ती महिला विशेष वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तिथे सामान्य लोकांचे प्रवेश बंद ठेवण्यात आले आहेत आणि मेडिकल टीम तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.