‘डिजिटल अरेस्ट’चे भूत पुन्हा नागरिकांच्या मानगुटीवर

-आणखी दाेघांना सायबर गुन्हेगारांनी गंडवले 47 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Digital Arrest : दिवाळीनंतर सायबर गुन्हेगारांच्या टाेळ्या पुन्हा सक्रिय झाल्या असून नव्याने विविध स्वरुपाच्या सायबर जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या चाेवीस तासांत नागपुरातील दाेन एका महिलेसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी डिजीटल अरेस्टची भीती दाखवून 47 लाखांनी फसवले. यावरुन डिजीटल अरेस्टचे भूत पुन्हा नागगरिकांच्या मानगुटीवर बसल्याचे दिसत आहे.
 
 
 
DIGITAL ARREST
 
 
पहिला घटना बजाजनगरच्या माधव नगर परिसरात घडली. निवृत्त बँक कर्मचाèयाला डिजिटल अटकेची भीती दाखवत सायबर गुन्हेगारांनी फसवले. या 71 वर्षीय ज्येष्ठाला 11 नाेव्हेंबरला वेगवेगळ्या नंबरवरून व्हाॅट्सअ‍ॅप व्हिडिओ काॅल आले. काॅल करणाèयांनी मुंबई पाेलिस, लखनऊ एटीएस आणि एनआयएचे अधिकारी असल्याची भीती दाखवत अटक वाॅरंट जारी हाेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या ज्येष्ठाने 29 लाख 30 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. जेव्हा त्यांनी पडताळणी केली असता ही फसवेगिरी असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी पाेलिसांत तक्रार केली. या प्रकरणामध्ये सायबर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
 
दुसèया प्रकरणात भारतीय दूरसंचार विभागात काम करणाèया महिला कर्मचाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 18 लाखांनी फसवले. जरीपटका काॅम्प्लेक्समध्ये राहणारी 37 वर्षीय महिला भारत संचार निगम लिमिटेडमध्ये नाेकरी करते. महिलेने यू ट्यूबवर ऑनलाइन शेअर ट्रेडिंगचा एक व्हिडिओ पाहिला. त्यात भरघाेस ना मिळण्याचे आमिष दाखवले जात हाेते. त्यावर विश्वास बसल्याने महिलेने तिथे दिलेल्या लिंक्स आणि क्रमांकावर संपर्क साधला. काही दिवसांतच तिने विविध 18 लाख 80 हजार रुपये गुंतवले. सुरुवातीला तिला परतावे दिले गेले. तिने सगळी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता तिची शिल्लक गाेठवली गेली . वारंवार प्रयत्न करूनही तिला प्रतिसाद मिळाला नाही. तिने सायबर पाेलिसांकडे तक्रार केली.