...आणि नवनीत राणा म्हणाल्या...मी पुन्हा येईन!

धारणीच्या सभेत राजकीय खळबळ

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
धारणी,
Navneet Rana wants to become an MP. धारणी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत एक प्रसंग विशेष ठरला. माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्पष्ट शब्दांत आपली राजकीय इच्छा व्यक्त केली “दादा, आता मलाही म्हणायची वेळ आली आहे की, मी पुन्हा येईन.” या एकाच वाक्याने सभेत उत्साहाची लहर उठली. नवनीत राणा म्हणाल्या की पराभवानंतरही त्या अखंड मेहनत करत लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. “बेटी वापस लाना है की नहीं? दादा, आम्ही हरूनही तुमच्या पाठिशी राहिलो. देवेंद्र भाऊ हे महिलांसाठी देवाभाऊ आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी पुन्हा माजी खासदार राहणार नाही, असे वक्तव्य करत त्यांनी पुन्हा खासदारकीची इच्छा उघड केली.
 
navnit rana
 
या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनीदेखील सभेत सूचक शब्द टाकत नवनीत राणा ‘माजी’ राहणार नाहीत असे सांगितल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. त्यांना राज्यसभा किंवा अन्य मोठ्या जबाबदारीची संधी मिळू शकते, अशा चर्चा सुरू झाल्या. याबाबत विचारले असता नवनीत राणा म्हणाल्या, भावासमोर बहिण बोलते यात वावगे काही नाही. याआधी देवाभाऊ म्हणाले होते. ‘मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बनाना, मैं समंदर हूं, फिर लौट के आऊंगा.’ त्याच धर्तीवर मीही म्हटलं की, ‘मैं फिर आऊंगी… मी पुन्हा येईल.’ यात गैर काय? माझ्या भावानेच सांगितलं की मी माजी राहणार नाही. त्यांचा शब्द पक्काच असतो.
 
 
राज्यातील महिलांमागे फडणवीस ठामपणे उभे राहिल्याचा विश्वास त्यांनी पुन्हा व्यक्त केला. दरम्यान, राज्यातील इतर राजकीय हालचालींमध्ये कणकवलीतही हलचल वाढली असून आमदार निलेश राणे यांनी मंत्री उदय सामंतांसह संदेश पारकरांना भेट दिल्याने तिथल्या समीकरणांनाही रंग चढला आहे.