मुंबई,
Palash's chat goes viral पलाश मुच्छल आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांच्या विवाहापूर्वीच सोशल मीडियावर गोंधळ माजला असताना, आता व्हायरल होत असलेल्या कथित चॅटमुळे चर्चांना अधिक ऊत आला आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणारा त्यांचा विवाहसोहळा मोठ्या आनंदात पार पडणार होता, हलदी ते संगीत अशा सर्वही विधी उत्साहात पार पडले. मात्र लग्नाच्या काही तास आधीच स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर सुरू झालेल्या तणावात पलाश मुच्छलनाही रुग्णालयात दाखल करावे लागले.
दरम्यान, विवाह पुढे ढकलल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही कथित चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. एका महिलेनं हे स्क्रीनशॉट शेअर करत त्यात पलाशसोबत झालेल्या कथित 'फ्लर्टिंग' चॅटचा दावा केला. त्या चॅटमध्ये पलाशने तिच्या दिसण्याची प्रशंसा केली होती आणि पहाटे बीचवर जाण्याचे सुचवलेल्याचे म्हटले जाते. मात्र हे चॅट खरे आहेत की खोटे, किती जुने आहेत किंवा कोणत्या संदर्भात आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. या स्क्रीनशॉटची पुष्टीही अद्याप कोणत्याच अधिकृत स्रोताकडून झालेली नाही.
या प्रकरणाला आणखी हवा मिळाली, जेव्हा चाहत्यांनी लक्षात आणले की स्मृती मानधनाने आपल्या इंस्टाग्रामवरून लग्नाशी संबंधित हलदी, मेहंदी, साखरपुडा अशा सर्व पोस्ट हटवल्या आहेत. परंतु पलाशसोबतचे जुने फोटो, वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्ट आणि इतर वैयक्तिक पोस्ट तिने तसेच ठेवल्या आहेत. यावरून हे स्पष्ट होते की तिने पोस्ट हटवण्याचा निर्णय हा कोणत्याही वैयक्तिक मतभेदामुळे नसून परिस्थितीच्या संवेदनशीलतेमुळे घेतलेला आहे. पलाशनेही आपल्या प्रोफाइलवरून फक्त नव्या विवाहाशी संबंधित पोस्ट हटवून जुनी पोस्ट कायम ठेवली आहेत. त्या दोघांनीही घेतलेले पाऊल हे अनावश्यक अफवा आणि वाद टाळण्यासाठी, तसेच दोन्ही कुटुंबांना शांत वातावरण मिळावे, यासाठी असल्याचे दिसून येते. सध्या दोन्ही कुटुंबे स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, याकडेच पूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत.