मुख्याध्यापक, शिक्षक मतदानात तर शाळा सांभाळणार कोण?

* शिक्षक संघटनेचे निवेदन

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
आर्वी, 
school-teacher-association : आर्वी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक खाजगी विद्यालयं, उच्च विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या निवडणूक कामात लावण्यात आले आहे. त्यामुळे शाळेत कोणीच राहणार नसल्याने एक तर मुख्याध्यापकांना या निवडणूक कामातून मुत करा किंवा सरसगट शाळांना सुट्टी द्या या मागणीचे निवेदन आर्वी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गावित यांना दिले.
 
 
 
KL
 
 
 
नगर परिषद निवडणुकीकरिता ग्रामीण भागातील सर्व मुख्याध्यापक व शाळेतील कर्मचार्‍यांची मतदान पथकात केंद्राध्यक्ष व अधिकारी म्हणून नियुती करण्यात आली आहे. त्यांचे पहिले प्रशिक्षण गांधी विद्यालयात २६ रोजी, दुसरे प्रशिक्षण २९ रोजी ठेवण्यात आले आहे. तसेच १ डिसेंबरला साहित्य वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शाळेतील मुख्याध्यापकांना कार्यभार सांभाळावा लागत असल्याने तसेच ऑनलाइन शिष्यवृती, ऑनलाइन संच मान्यता, फेब्रुवारी मार्च २०२६ बोर्ड परीक्षा, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्याचे काम सुरू आहे. २ डिसेंबर हा कामकाज दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद ठेऊ शकत नाही. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुख्याध्यापकांना निवडणूक कामापासून वगळण्यात यावे अन्यथा संबंधित शाळांना सुट्टी घोषित करावी, अशी मागणी केली.
 
 
सुट्टी देण्याचा अधिकार नाही : गावित
 
 
मुख्याध्यापकांचे निवेदन प्राप्त झाले काही मुख्याध्यापकांच्या निवडणूक कार्यात केंद्राध्यक्ष आणि अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. परंतु, सुट्या देण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यांनी या संदर्भात शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करावी, अशी प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गावित यांनी दिली.