तभा वृत्तसेवा
आर्णी,
sand-transport-vehicle-road-damage : सावळीसदोबा ग्रामीण भागातील खराब झालेले रस्ते दीर्घकाळपर्यंत दुरुस्त केले जात नाहीत, हा नेहमीचा अनुभव आहे. सावळीसदोबा परिसरातही हीच परिस्थिती आहे. नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर परिसरात अलीकडच्या काळात काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
तर काही नवीन तयार झाले. अशा रस्त्याची रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे पूर्णतः वाट लागली आहे. या रस्त्यांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.काही ठिकाणची गिट्टी उखडली आहे. अशा भागातून मार्ग काढताना नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सावळी सदोबा परिसरात रेतीच्या अवैध वाहतुकीला ऊत आला आहे. दिवसरात्र विविध प्रकारच्या वाहनांद्वारे रेतीची वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा अधिक रेती भरून वाहने भरधाव नेली जात आहे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाèयांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या तस्करांचे चांगलेच फावत आहे.
सतत सुरू राहणाèया या वाहनांमुळे रस्ते खराब होत आहेत. ही समस्या संबंधित यंत्रणेकडे वारंवार मांडूनही लक्ष दिले जात नाही. काहीही उपाययोजना केल्या जात नसल्याने रेतीतस्करांचे चांगलेच फावत आहे.
सावळी सदोबा परिसरात अलीकडे काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. तर काही नवीन रस्ते तयार करण्यात आले. ही कामे करून घेण्यासाठी नागरिकांना संबंधित लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी यांच्याकडे वारंवार चकरा माराव्या लागल्या. अनेक प्रयत्नांनंतर ही कामे पूर्णत्वास गेली. आता खराब झालेल्या अशा भागांतून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
महसूल यंत्रणेची डोळेझाक
सावळीसदोबा परिसरात सुरू असलेल्या रेती तस्करीकडे महसूल यंत्रणेची डोळेझाक सुरू आहे. तलाठी, मंडळ अधिकारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. रेतीचोरी प्रकरणात या भागात पोलिस, महसूल विभागांकडून अपवादानेच कारवाई झाली आहे. या विभागाच्या वरिष्ठांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सावळी परिसरात दिवसरात्र सुरू राहणाèया वाहतुकीमुळे नागरिकांची उडाली झोप आहे.