अनिल कांबळे
नागपूर,
school van आपला मुलगा स्कूल बस किंवा व्हॅनने शाळेत जात असेल तर तो सुरक्षित पोहोचतोय् का, याबाबत पालक चिंतेत असतात. एकदा का पाल्य स्कूल व्हॅन आणि बसमध्ये बसला की तो शाळेत पोहोचेपर्यंत किंवा घरी येईपर्यंत पालकांना काळजी असते. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत १० हजारांपेक्षा जास्त स्कूल व्हॅन-बसेसवर चालान कारवाई करण्यात आली आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरातील जवळपास प्रत्येक शाळा-महाविद्यालयात स्कूल व्हॅन आणि बसने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येते, तर काही शाळांमध्ये स्कूल बस अनिवार्य करण्यात आली आहे. एका-एका शाळेत ५ ते २० स्कूल बसेस शहरातील जवळपास प्रत्येक शाळा-महाविद्यालयांना स्कूलव्हॅन आणि स्कूलबसने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येते. तर काही शाळांमध्ये स्कूलबस अनिवार्य करण्यात आली आहे. एका-एका शाळेत 5 ते 20 स्कूलबसेस आणि 30 ते 50 स्कूलव्हॅनची व्यवस्था असते. शाळेत वेळेवर पाेहचविण्याची जबाबदारी व्हॅन आणि बसच्या चालकांवर असते. त्यामुळे शहरातील विविध भागांमधून विद्यार्थी बसमध्ये काेंबल्या जातात. पालकांकडून मुलांना साेडण्यास उशिर झाल्यास बसचालक शाळेच्या वेळेवर पाेहचण्यासाठी सुसाट बस चालवितात. यादरम्यान, ते काेणत्याही वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. तसेच स्कूल व्हॅनचालकसुद्धा चक्क ओव्हरटेक करुन व्हॅन पळवतात. यादरम्यान, त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन हाेते. आरटीआय कार्यकर्ते अभय काेलारकर यांना प्राप्त माहितीनुसार, गेल्या 2023 ते नाेव्हेंबर 2025 अशा जवळपास तीन वर्षांत नागपुरात 10 हजार 186 वेळा स्कूलव्हॅन आणि स्कूलबसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.school van सकाळच्या सुमारास भरधाव असलेली शाळांची वाहने वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे अपघात हाेऊन शेकडाे विद्यार्थ्यांचा जीव धाेक्यात असताे. अनेकदा वाहनचालक दारुच्या अंमलाखाली वाहन चालवताे तर कधी ओव्हरटेक करुन धाेकादायकरित्या बसेस चालवताे.
सर्वाधिक कारवाई सीताबर्डीत
गेल्या तीन वर्षांत दहा हजारांवर कारवाई करण्यात आली असून सर्वाधिक कारवाई सीताबर्डी वाहतूक झाेनमध्ये करण्यात आली. सीताबर्डी हद्दीत 6 हजार 64 वेळा स्कूलबस-व्हॅनवर कारवाई करण्यात आली. तसेच कारवाईच्या ‘टाॅप-5’ मध्ये लकडगंज (907), सक्करदरा (787), अजनी (681), सदर (635) आणि एमआयडीसी (407) या वाहतूक विभागाचा क्रमांक लागताे.
अशी झाली कारवाई
स्कूलबस-व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असणे, विनापरवाना चालक, अप्रशिक्षित अटेंडंट्स, देेखभालीचा अभाव, स्पीड गव्हर्नर नसणे, आपत्कालीन सुविधांचा अभाव, खाजगी व्हॅन चालविणारे चालक परवानगी किंवा पडताळणीशिवाय कार्यरत असणे, अशा कारवाईचा समावेश आहे. अनेकदा वाहतूक पाेलिस चालकांसाेबत ‘अर्थपूर्ण’ संबंध जाेपासतात, त्यामुळे कारवाईकडे कानाडाेळा केल्या जाते, अशी माहिती आहे.