साक्षगंधाच्या कार्यक्रमात गाेळीबार करणाऱ्या सात जणांना अटक

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
firing at engagement कळमेश्वरजवळील शंकरपट गावातील नात्यातील मुलीचा साक्षगंधाचा कार्यक्रम संपताच जुन्या वैमनस्यातून झालेल्या गाेळीबार प्रकरणात पाेलिसांनी साेमवारी 7 जणांना अटक केली. माेहपाजवळील शंकरपट येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत बाल्या हिरामण गुजर हा जखमी झाला हाेता.
 

गोळीबार  
 
 
रविवारी शंकरपट येथे साक्षगंधाचा कार्यक्रम संपताच देवा ऊफर् परमेश्वर पिसाराम एकनाथ याने जुन्या कारणावरून वाद घालायला सुरूवात केली. हा वाद इतका विकाेपाला गेला की, मारहाण व नंतर थेट गाेळीबारापर्यंत प्रकरण गेले. देवा साेबत तपन पिसाराम एकनाथ, आकाश एकनाथ, माेरेश्वर एकनाथ, सावन एकनाथ, काशिराम एकनाथ व दिनेश सनेश्वर यांनी गाेळीबार करत बाल्या गुजरला जखमी केले. त्याला लागेच येथील रुग्णालयात हलविले. घटनेनंतर आराेपी पसार झाले. माहिती मिळताच कळमेश्वर पाेलिसांनी पंचनामा करत आराेपींच्या शाेधार्थ पथक रवाना केली.firing at engagement काही वेळातच विविध ठिकाणांहून आराेपींना अटक करण्यात आली. देवा एकनाथने केलेल्या गाेळीबारात बाल्या गुजरची मांडी व छातीवर गाेळ्या लागल्या. 4 महिन्यांपूर्वी बाल्याने देवाचे अपहरण केल्याची माहिती आहे. त्या वादातूनच हा हल्ला झाला असावा असा पाेलिसांना संशय आहे. गाेळीबारानंतर निर्माण झालेल्या गाेंधळात बाल्याचा भाऊ सुनील गुजर, मुकश मापूर आणि अन्य काही पाहुणेही जखमी झाले. जखमी बाल्याला मेडिकलमध्ये तर इतरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.