स्मृतीने इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचे फोटो व व्हिडिओ हटवले

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Smriti engagement photos भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधन आणि संगीतकार व चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे होणार होते, पण अचानक पुढे ढकलण्यात आले आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या समारंभाचा उत्साह जोरात सुरू असताना, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. पलाश मुच्छल यांची बहीण आणि गायिका पलक मुच्छल यांनी ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितली आहे. त्यांनी लिहिले की, "स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे स्मृती आणि पलाशचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. या संवेदनशील काळात आम्ही सर्वांना दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो.
 
madhana 
दरम्यान, स्मृती मानधनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एंगेजमेंट आणि प्रपोजलचे फोटो व व्हिडिओ काढून टाकले आहेत. स्मृती आणि पलाशने मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये फिल्मी शैलीत प्रपोजल केले होते, ज्यामध्ये पलाशने गुडघ्यावर बसून स्मृतीच्या बोटात अंगठी घातली आणि फुलांचा गुच्छ दिला होता. या व्हिडिओने सर्वत्र चर्चा निर्माण केली होती आणि चाहते अभिनंदन करत होते.  स्मृतीने आता ही पोस्ट डिलीट केल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. काही फोटो अजूनही इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत, पण साखरपुड्याची पोस्ट गायब आहे. दोघांपैकी कोणीही अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही. पलाश मुच्छल आणि स्मृती मानधन यांचे लग्न पुढे ढकलले गेले तरी, त्यांच्या कुटुंबाने चाहत्यांना गोपनीयता राखण्याचे आवाहन केले आहे.