शिक्षकांचे ५ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Statewide teachers' protest महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ५ डिसेंबर रोजी शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांशी संबंधित मूलभूत प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीने लाक्षणिक संप आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्च्यांचे आयोजन जाहीर केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सक्रिय व निर्णायक सहभाग नोंदवणार आहे.
 
 

teacher strike 
शिक्षक संघटनांचे मुख्य मागण्या आहेत, २०११ पूर्वी सेवेत दाखल शिक्षकांना टीईटीमधून सूट देणे, जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना, १०-२०-३० वेतन प्रगती लागू करणे, संचमान्यतेतील त्रुटींचा तातडीने निपटारा करणे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या अडकलेल्या पदोन्नती तत्काळ मंजूर करणे, तसेच शिक्षकांना केवळ अध्यापनाची कामे देणे. या सातत्याने प्रलंबित मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे शिक्षक संघटनांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघ आणि राज्य प्राथमिक शिक्षक संघाची ऑनलाईन बैठक रविवारी पार पडली, ज्यात आंदोलन यशस्वी करण्याचा ठराव मंजूर झाला, अशी माहिती बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.