विद्यापीठाच्या परीक्षा उद्यापासून

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
नागपूर,
university exams राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2025 परीक्षा बुधवार 26 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. हिवाळी परीक्षा नियोजनाबाबत प्राचार्य, केंद्रप्रमुखांची बैठक परीक्षा भवनात पार पडली. या बैठकीत हिवाळी परीक्षा नियोजनाबाबत माहिती देण्यात आली.
 

नागपूर युनिव्हर्सिटी  
 
 
बैठकीला परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रभारी संचालक डॉ. मनीष झोडपे, उपकुलसचिव डॉ. नवीनकुमार मुंगळे, सहाय्यक कुलसचिव नितीन कडबे, डी. एस. पवार, अधीक्षक राजेंद्र पाठक यांची उपस्थिती होती. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. मनीष झोडपे यांनी विद्यापीठ परिक्षेत्रातील नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया, वर्धा आदी जिल्ह्यातील 125 पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर हिवाळी परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. हिवाळी परीक्षेदरम्यान महाविद्यालयीन स्तरावरील सत्रांच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार असून सुरुवातीला अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा व त्यानंतर टप्प्या-टप्प्याने नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील.university exams परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना उपयुक्त सुविधा देण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या जवळपास एक हजारांपेक्षा अधिक विविध परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या दृष्टीने आवश्यक सूचना सर्व प्राचार्य केंद्रप्रमुख संबंधित लिपिक यांना देण्यात आल्या. बैठकीला परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य केंद्रप्रमुख व संबंधित लिपिक उपस्थित होते.