वर्धा,
brass-copper-utensils-stolen : बंद घरातून पितळ व तांब्याचे भांडे चोरून नेणार्या टोळीला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी २ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हिमालयविश्व परिसरातील रहिवासी आदित्य नारनोली यांच्या भामटीपुरा भागातील कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्यांनी ८६ हजार ४०० रुपये किंमतीचे पितळ व तांब्याचे भांडे चोरून नेले. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत अवघ्या काही तासांत संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यातील नंदनी मिटकर (२१), रुपा मिटकर (१९), कलावती देऊळकर (१९) तिन्ही रा. गिट्टीखदान बोरगाव मेघे यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल नियोजित ठिकाणी नेण्यासाठी नदीम जमील सैय्यद रा. गिट्टीखदान बोरगाव मेघे याच्या एम. एच. ३२ ए. के. २००५ क्रमांकाचा ऑटोरिक्षा वापरल्याचेही पोलिसांना सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, राजेश राठोड, राजेश डाळ, सूरज जाधव, योगेश ब्राह्मणे, साक्षी चौधरी, पूनम ठाकरे यांनी केली.