bhandara news भंडारा जिल्हा सामान्य एका वार्डात उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णाने आज रुग्णालयाच्या छतावरून पडून तरुण रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णांने उडी घेतली की आणखी काय या संदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. अखिलेश मरसकोल्हे असे रुग्णाचे नाव आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 18 मध्ये उजव्या हाताला जळाल्याने उपचारासाठी मध्य प्रदेशातील तिरोडी येथील अखिलेश मरसकोल्हे हा 23 वर्षाचा तरुण दोन दिवसांपूर्वी दाखल झाला होता. आज 25 रोजी दुपारच्या सुमारास हा रुग्ण वॉर्डात असताना अचानक आई कुठे गेली म्हणून तिसऱ्या मजल्यावरून सैरभर पळू लागला.
तेथील परिचारकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही न जुमानता तो रुग्णालयाच्या छताच्या दिशेने पळाला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र छताचे दार तोडून छतावर चढण्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जाते. दरम्यान यातच छताची सुरक्षा भिंत ओलांडून पुढे गेल्याने पाय घसरून तो पडल्याचा अंदाज बांधला जात आहे.bhandara news छतावरून खाली कोसळल्याने यात काही वेळातच त्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून हि घटना रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे बोलल्या जात आहे.