कारला अपघातात पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

राष्ट्रीय महामार्गावरील घटना

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
गोंदिया,
car accident लग्न समारंभ आटोपून परत जात असलेल्या दाम्पत्यांच्या कारला अपघात होऊन पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील नवाटोला परिसरात राष्ट्रीय महामार्गावर घडली.
 

accident 
 
 
गीता प्रशांतकुमार श्रीवास्तव (50) असे मृत पत्नीचे प्रशांतकुमार श्रीवास्तव असे गंभीर जखमी पतीचे नाव आहे. दोघेही वर्धा जिल्ह्यातीलल सेलू येथील रहिवासी असून प्रशांतकुमार हे सेलू पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. प्राप्त माहितीनुसार, श्रीवास्तव दांपत्य नातेवाईकांचे लग्न समारंभ आटपून कार क्र.एम.एच.33 ए एस 1020 ने दोघेही सोमवारी रायपूर वरून वर्धेला परत जात होते. दरम्यान, दुपारी 3 वाजताच्या सुमारास देवरी जवळील नवाटोला शिवारात भरधाव वेगात असलेली त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्याखालील खड्ड्यात झाडाला जावून धडकली.car accident यात गीता यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक प्रशांतकुमार हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पुढील तपासाला सुरुवात केली आहे.