नागपूर,
Woman molested in night पती बाहेरगावी गेल्यानंतर घरात एकटी झाेपलेल्या महिलेच्या घरात तिचा ओळखीचा युवक शिरला. त्याने उधार दिलेल्या पैशाच्या बदल्यात शारीरिक संबंधाची मागणी करीत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महिलेचा पती घरी पाेहचला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन पाचपावली पाेलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली. भूपेश (42) असे आराेपी युवकाचे नाव आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 28 वर्षीय महिलेला दाेन हजार रुपयांची गरज हाेती. तिने एका मैत्रिणीच्या माध्यमातून आराेपी भूपेश डाेंगरे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने दाेन हजार रुपये एका महिन्यांसाठी उधार दिले. यादरम्यान, त्यांचा माेबाईलवरुन संवाद सुरु हाेता. महिना उलटल्यानंतर ताे महिलेला पैशांची मागणी करीत हाेता. मात्र, ती त्याला टाळाटाळ करीत हाेती. शनिवारी महिलेचा पती बाहेरगावी गेला हाेता. ती दाेन्ही मुलांसह घरात झाेपली हाेती.आराेपी भूपेश हा महिलेच्या मध्यरात्री महिलेच्या घरी गेला.
महिलेने दार उघडले त्याने महिलेला पैशांची मागणी केली. तिने पती घरी नाहीत, पती गावावरुन परत आल्यानंतर पैसे परत करण्याबाबत सांगितले. तरीही ताे तिच्याशी वाद घालत हाेता. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी करुन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. घटनेवळी, पीडित महिलेचे पती अचानक घरी आला. पतीला बघताच आराेपी भूपेश याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर, पीडित महिलेने तात्काळ पाचपावली पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपी भूपेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.
आराेपीला दिला चाेप
महिलेशी अश्लील वर्तन करीत असताना अचानक तिचा पती घरी आल्यामुले महिलेला धीर आला. त्यामुळे अनर्थ टळला. पत्नीशी गैरवर्तन करताना दिसल्यानंतर त्याने भूपेशला चांगला चाेप दिला. त्यानंतर भूपेशने त्याच्या तावडीतून सुटका करुन पळ काढला, अशी चर्चा आहे.