नवी दिल्ली
isro-gaganyaan-mission भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी रविवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. या घोषणेमुळे केवळ अमेरिकेचा अभिमानच नव्हे तर चीन आणि पाकिस्तानलाही इस्रोच्या झेपेचा प्रत्यय येणार आहे. इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी गगनयान कार्यक्रमांतर्गत मार्च २०२६ पर्यंत सात मोहिमा प्रक्षेपित करण्याचे ध्येय निश्चित केले आहे, ज्यामध्ये पहिली मानवरहित मोहीम सर्वात महत्त्वाची ठरणार आहे.

गगनयान मोहिमेअंतर्गत मानवयुक्त मोहिमेपूर्वी तीन मानवरहित मोहिमा पार पाडल्या जाणार आहेत. त्यापैकी पहिले प्रक्षेपण, “G1 मिशन”, मार्च २०२६ मध्ये होण्याची अपेक्षा आहे. सीएमएस-०३ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर नारायणन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, मार्च २०२६ च्या अखेरीस सात प्रक्षेपणांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. हे उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील पाच वर्षांत ५० रॉकेट प्रक्षेपणांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहेत. isro-gaganyaan-mission नारायणन यांनी सांगितले की, रविवारी झालेल्या LVM3-M05 प्रक्षेपणानंतर इस्रो आणखी एक LVM3 रॉकेट व्यावसायिक संप्रेषण उपग्रह घेऊन अंतराळात पाठवणार आहे. तसेच, इस्रोने PSLV-N1 नावाची आणखी एक तांत्रिक प्रायोगिक मोहीम आखली आहे, जी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या बरोबरच GSLV-F17 मोहिमाही मार्च २०२६ पूर्वी प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू आहे.
रविवारी इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून भारताचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह CMS-03 यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. हे प्रक्षेपण स्वदेशी विकसित LVM3-M5 रॉकेट द्वारे करण्यात आले. सुमारे ४,४०० किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून सायंकाळी ५:२६ वाजता उड्डाण केले. isro-gaganyaan-mission या यशस्वी मोहिमेमुळे इस्रोने पुन्हा एकदा भारताला अंतराळशक्ती म्हणून अधिक सक्षम बनवले आहे.