तभा वृत्तसेवा
पुसद, 
 Anil Thakur  अॅड. अनिल ठाकूर यांनी हॉटेल अनुप्रभा येथे पत्रकार परिषद घेऊन आगामी नगर परिषद निवडणूक पुसद विकास मंचच्या माध्यमातून निर्धार व्यक्त केला.
 
  
अनिल ठाकूर यांनी पत्रकारांना दिलेल्या भल्यामोठ्या जाहीरनाम्यात पुसद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे सांगून दहा, 20 नव्हे 100 कलमी कार्यक्रम सुचविला आहे. त्यामध्ये नगर परिषदद्वारे सात ठिकाणी अत्याधुनिक मॉल बनविणे व एक हजार दुकान गाळे बनविणे, नगर परिषदेतर्फे अत्याधुनिक हॉस्पिटल बनविणे, नगर परिषदेद्वारा आजवर प्रलंबित संभाजीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह पूर्ण करणे, हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, दिल्ली, जपानसारख्या शाळा निर्माण करून ए.आय. व तांत्रिक शिक्षणासह सर्वांना सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षणाची सोय करणे एवढेच नव्हेतर पुसद शहराचा सर्वागीण विकास व भ्रष्टााचारमुक्त प्रशासनासाठी आपण समर्पित असल्याचे सांगितले. एकंदर अनिल यांनी पुसद विकास मंचचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यात युरोप आणि अमेरिकेतील शहरापेक्षाही प्रगतीशील शहर बनवू असे म्हटले आहे. या पत्रपरिषदेला दारा ठाकूर, विजय विश्वकर्मा, अॅड. अर्जुन ठाकूर व ललित चौहान उपस्थित होते.      
            
चार वजनदार नेते कोण ?             
        
या ठिकाणी उलेखनीय बाब अशी की, पुसदच्या चार वजनदार नेत्यांचे तसेच काही राजकीय पक्षांचे समर्थन आहे. परंतु त्यांची नावे यावेळी यांनी सांगितली नाही. पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षासह पंधराही प्रभागात पुसद विकास मंच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.