अर्जुनी मोरगाव,
arjuni mor news तालुक्यात नावारूपास आलेली व मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शासकीय हमीभाव धान खरेदीमध्ये सन २०२४-२५ या वर्षात सर्वाधिक उत्कृष्ट धान खरेदी केल्याबद्दल अर्जुनी मोरगाव तालुका खरेदी विक्री समिती सहकारी संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मुंबई नरिमन पाईंट येथे ३१ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पणन महासंघाच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाच्या मंडळ ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्य शासन खरेदी विभागांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल अर्जुनी मोरगाव तालुका खरेदी विक्री समितीला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी. डुबे पाटील (भाप्रसे), उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम, अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांच्या हस्ते खरेदी विक्री समिती अर्जुनी मोर.चे उपाध्यक्ष विजय नामदेव कापगते यांना प्रदान करण्यात आला. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे उपअभिकर्ता संस्था म्हणून खरेदी विक्री समिती अर्जुनी मोर. ही तालुक्यात सात ते आठ केंद्राच्या माध्यमातून शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र चालविते.arjuni mor news सन २०२४ - २५ मधील सर्वोत्कृष्ट धान खरीददार संस्था म्हणून या समितीला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल खरेदी विक्री समितीचे संचालक मंडळ, तालुक्यातील विविध पदाधिकारी, धान उत्पादक शेतकर्यांनी अभिनंदन केले आहे.