बाभुळगावात राष्ट्रीय किसान मोर्चाची सभा

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा

बाभुळगाव,
Babhulgaon farmer rally, शेतकèयांना राज्य कृषी मूल्य आयोगाने काढलेल्या उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्रानुसार हमीभाव मिळण्याची शाश्वत व्यवस्था सरकारने केली पाहिजे, असे यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष दीपक इंगळे यांनी सांगितले. राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकèयांना जोडून शेतकèयांची खरी लढाई लढण्याकरिता, शेतकèयांमध्ये जनजागृती मोहीम राबवत ‘चलो गाव की ओर’ या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय किसान मोर्चाची किसान सभा बाभुळगाव येथील समाज भवनात झाली. शेतकरी या देशाचा पोशिंदा आहे, शेतकèयांच्या कष्टकरी, कामगारांच्या तळहातावर हा देश उभा आहे. परंतु त्या शेतकèयाची परिस्थिती आज दयनीय झाली असून आजी-माजी सरकारने शेतकèयांना समृद्ध होण्यापासून रोखले आहे.
 

Babhulgaon farmer rally 
आजी-माजी सरकारने शेतकèयांच्या हिताची कोणतीच योजना राबवली नसून शेतकèयांना लाचार बनवण्याचे धोरण राबवले आहे. शेतकèयांची लढाई यापुढे राष्ट्रीय किसान मोर्चा मोठ्या ताकदीने लढत राहील. वास्तविक उत्पादन खर्चावर आधारित भाव सरकार देत नसल्याने ज्या शेतकèयांचे वर्षाकाठी 25 क्विंटल सोयाबीन, कापूस विकला त्याचे वर्षाकाठी 2.5 लाख रुपयांचे नुकसान होते. शेतकèयांवर कर्ज 50 हजार ते 3 लाख एवढे असू शकते व आतापर्यंत शेतकèयांची तीनदा कर्जमाफी करण्यात आली. याचा अर्थ कर्ज परतफेडीपेक्षा वर्षाकाठी होणारे प्रतिक्विंटलमागे नुकसान फार मोठ्या प्रमाणात म्हणजेच लाखाच्या घरात आहे. म्हणून शेतकèयाला पिकखर्चाच्या दीडपट स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशीनुसार जर भाव लागू केले तर शेतकèयांच्या आर्थिक स्थितीला मजबूत केल्या जाऊ शकते. परंतु सरकार या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकèयांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे.
किसान सभेला संबोधित करताना म्हटले, यावेळी शेतकèयांना 24 तास वीज, ‘इनकम रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅग्रिकल्चर’ या कायद्यांतर्गत शेतकèयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशा अनेक बाबींवर सविस्तरपणे जनजागृती करून शेतकèयांना या शेतकरी चळवळीशी जोडण्याचे काम करण्यात येत आहे.
 
 
 
यावेळी बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ-वाशिम-लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनीसुद्धा शेतकèयांच्या समस्यांवर आपले मत व्यक्त केले. सदैव शेतकèयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकèयांची लढाई राष्ट्रीय किसान मोर्चाच्या खांद्याला खांदा लावून लढू, असे सांगितले. राजू देशमुख व दिलीप वाघमारे यांनीसुद्धा शेतकèयांच्या समस्येवर विचार व्यक्त मांडले.
 
 
 
 
यावेळी राष्ट्रीय Babhulgaon farmer rally किसान मोर्चा बाभुळगाव तालुकाध्यक्ष म्हणून किशोर हिवसे, तालुका महासचिव म्हणून दिनेश अर्जुने यांची, तर तालुका संयोजक म्हणून लुनेश्वर ठाकरे यांची निवड करण्यात आली. सूसंचालन संघपाल खंडेराव यांनी, तर प्रास्ताविक भारत मुक्ती मोर्चा यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी केले. आभारप्रदर्शन भारत मुक्ती मोर्चा उपाध्यक्ष सुरेंद्र परडके यांनी केले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गुलाब कन्नलवार, मनोज आत्राम, चिंतामण जाठे, समाधान सावळे, कृष्णभान रंगारी, किशोर गावंडे, रामकृष्ण तांबोळे, ओमप्रकाश कांबळे, राजू डफाडे, त्रिशरण गायकवाड, विलास भोयर, बळवंत खडसे, देवराव साठे, अमोल ढोकणे, राजेंद्र चव्हाण, मनोज ढोकणे, सोमराज मेंढे, निरंजन गाढे, श्रीकृष्ण सुरपाम, रमेश भोयर यांनी सहकार्य केले. यावेळी या किसान सभेला बाभुळगाव, नेर, यवतमाळ येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
----