एटापल्ली,
bjps rekha mohurle एटापल्ली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटी-तटीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अखेर महायुती समर्थित भाजपाच्या रेखा गजानन मोहुर्ले (रेखाकाकु) यांनी 11 मतांनी विजय मिळवत विरोधकांना जबरदस्त धक्का दिला आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार दिपयंती पेंदाम यांना केवळ 6 मते मिळाली. या निकालानंतर एटापल्ली नगरपंचायतीच्या राजकारणात महायुतीने आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले असून, शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
11 विरुद्ध 6 अशा मतांनी मिळवलेला हा विजय केवळ आकड्यांचा नव्हे, तर जनतेच्या विश्वासाचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा विजय आहे. रेखा मोहुर्ले यांनी आपला प्रामाणिक जनसंपर्क, संघटनशक्ती आणि शांत स्वभाव यामुळे नगरसेवकांचा आणि जनतेचा विश्वास संपादन केला. त्यांच्या विजयाने एटापल्ली नगरपंचायतीत महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळाली असून, नागरिकांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. निकाल जाहीर होताच एटापल्ली शहरात फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, आणि रेखा काकू झिंदाबाद! महायुतीचा विजय अमर रहे! अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेला. समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना मिठ्या मारल्या, तर नागरिकांनी रेखा मोहुर्ले यांचे अभिनंदन करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. महिलांनीही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून या विजयाचा उत्सव साजरा केला. या विजयानंतर नगरपंचायतीच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व अधिक दृढ झाले असून, आगामी थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी हा विजय निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम आणि बालु राजकोंडावार यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करून विकासाचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाली आहे.
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची निर्णायक भूमिका
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहेरी विधानसभेचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम हे सकाळपासूनच एटापल्लीत उपस्थित राहून निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर बारीक लक्ष ठेवून होते. त्यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे, राजकीय समन्वयामुळे आणि मार्गदर्शनामुळेच महायुतीला एकजुटीने लढण्यास बळ मिळाले.bjps rekha mohurle स्थानिक पातळीवरील उमेदवारांच्या निवडीपासून ते मतदानाच्या अंतिम क्षणांपर्यंत धर्मरावबाबा आत्राम यांनी संघटनाला दिशा देत महायुतीचा विजय पदरात पाडण्यात मोलाची भूमिका बजावली. राजकीय जाणकारांच्या मते, त्यांच्या कुशल नियोजनामुळेच विरोधकांचा डाव कोलमडला आणि रेखा मोहुर्ले यांचा विजय निश्चित झाला.
बालु राजकोंडावार खरे किंगमेकर
या विजयानंतर बालु उर्फ प्रसाद राजकोंडावार यांचे नाव देखील सर्वत्र गाजत आहे. त्यांनी मागील काही दिवसांत पक्षांतील तणाव कमी करून महायुतीच्या उमेदवाराभोवती एकजुटीचे वातावरण निर्माण केले. त्यांची रणनीती आणि राजकीय कौशल्यामुळे महायुतीचा विजय निश्चित झाला आणि त्यांनी खर्या अर्थाने किंगमेकरची भूमिका पार पाडली.