दुर्वांकुर मंडळात रक्तदान शिबिर उत्साहात

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Blood donation camp सेन्ट्रल रेल्वे कॉलनी, ओंकार नगर येथे दुर्वांकुर शारदोत्सव मंडळाच्या वतीने पाच दिवसीय शारदा उत्सवाची सुरुवात झाली असून यंदा या उत्सवाचे १४ वे वर्ष आहे. भजन, सुगम संगीत, सप्तशती पाठ, गायत्री यज्ञ असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
 
 
Blood donation camp
 
याच निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या टीमने शिबिराचे संचालन केले असून एकूण २६ नागरिकांनी रक्तदान केले. Blood donation camp आगामी कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन शारदोत्सव मंडळाच्या आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: मिलिंद शिनखेडे, संपर्क मित्र