संजय इंडस्ट्रीज जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ

पहिल्या दिवशी भेटला ७२०९ रुपये भाव

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
देवळी, 
sanjay industries येथील संजय इंडस्ट्रीज जिनिंग अँड प्रेसिंग फॅटरी येथे यावर्षीच्या कापूस खरेदी हंगामाचा शुभारंभ झाला. यावेळी प्रथम आलेल्या पाच बैलबंडी व गाड्यांचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय कामनापूरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय इंडस्ट्रीजचे मालक नेमचंद घिया व विनोद घिया, संजय घिया, विकास घिया, माजी नगराध्यक्ष जब्बार तंवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरीष ओझा, जयकुमार वाकडे, माजी संचालक सुशिल तिवारी, बजरंग दलचे दिनेश क्षीरसागर, गोल्डी बग्गा, प्रवीण तेलरांधे तर व्यापारी महेश अग्रवाल, नरेश अग्रवाल, सोनू जावंधीया, त्रिलोक टावरी, जगदीश ज्योतवाणी, राकेश मोहता, धीरज घुंगट आदी उपस्थित होते.
 

संजय इंडस्ट्री  
 
 
पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी कापूस विक्रीसाठी गर्दी केली. यावेळी प्रथम आलेल्या पाच शेतकर्‍यांच्या कापसाला प्रती क्विंटल ७ हजार २०९ भाव देण्यात आला. या शेतकर्‍यांमध्ये संजय सोनटक्के, सुधाकर क्षीरसागर (नादोरा), गोपाल वैद्य (पडेगाव), प्रवीण वाघ (चिखली), अवधूत कामडी (सालोड) यांचा समावेश आहे.sanjay industries या शेतकर्‍यांच्या बैलगाड्यांचे पूजन करून शेकर्‍यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. या प्रसंगी मापारी सतिश चौधरी, पद्माकर बिरे, बाजार समितीचे कर्मचारी संदीप ढोक व तुषार बोंबडे आदी शेतकरी उपस्थित होते.