दाेन वर्षांच्या तुलनेत उपराजधानीत बालगुन्हेगारीत घट

- 70 बालगुन्हेगारांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न - पाेलिस आयुक्तांच्या प्रयत्नांना यश

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
decrease-in-juvenile-crime-in-nagpur पालकांचे दुर्लक्ष, हालाखीची काैटुंबिक स्थिती, वाईट संगत आणि व्यसने, त्यात साेशल मीडियाचा अतिवापर यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे समाेर आले आहे. मात्र, गुन्हेगारी जगताकडे पाऊल टाकण्याच्या तयारीत असलेल्या मुलांना जर सकारात्मक समूपदेशन करीत बालगुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले आहे. गेल्या दाेेन वर्षांच्या तुलनेत यावर्षी बालगुन्हेगारीत माेठी घट झाली आहे. यावर्षी केवळ 70 बालगुन्हेगार (विधी संघर्षग्रस्त बालक) असून त्यांना केअरच्या माध्यमातून समाजाच्या प्रवाहात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.
 
 
decrease-in-juvenile-crime-in-nagpur
 
बालगुन्हेगारी ही महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय आहे. सराईत गुंड गुन्हेगारी कृत्यासाठी काही मुलांचा उपयाेग करुन कायदाचा दूरुपयाेग करत असल्याचीही धक्कादायक बाब यानिमित्ताने समाेर आली आहे. माेठमाेठ्या गुन्हेगारांचे अनुकरण आणि गुन्हेगारी जगताच्या आकर्षणाला बळी पडून बालगुन्हेगार निर्माण आहेत. मात्र, बालगुन्हेगारी राेकण्यासाठी पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल हे सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. पाेलिस दीदी, पाेलिस काका, केअर, भराेसा सेल, ऑपरेशन थंडर, बालरक्षक पथकाच्या माध्यमातून बालकांच्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. decrease-in-juvenile-crime-in-nagpur गेल्या दाेन वर्षांची तुलना केल्यास यावर्षी बालगुन्हेगारीत माेठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. गेल्या दाेन वर्षांत अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असलेले 537 गुन्हे दाखल आहेत.या गुन्ह्यांमध्ये 537 बालगुन्हेगारांची नावांची पाेलिस दप्तरी नाेंद आहे. मात्र, 2025 मध्ये केवळ 49 गुन्ह्यांची नाेंद असून त्यात 70 बालगुन्हेगारांचा समावेश आहे. यावरुन जवळपास पाच पटींनी बालगुन्हेगारी घटल्याची सकारात्मक बाब समाेर आली आहे. अल्पवयीन मुलांमध्ये चाेरी, घराेडी, माेबाईल हिसकावणे, दुखापती करणे, मारामारीसारखे किरकाेळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही. मात्र, गेल्या दाेन वर्षांंत शहरात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही मुलांचा समावेश वाढल्याचे समाेर आले आहे.
बालगुन्हेरांवर अशी हाेते कारवाई
विधीसंघर्षग्रस्त बालकांला पाेलिस अटक करु शकत नाहीत. त्याला ताब्यात घेण्यात येते. त्यानंतर त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येते. गुन्ह्याचे स्वरूप पाहून निरीक्षणगृहात दाखल केले जाते. decrease-in-juvenile-crime-in-nagpur बाल न्याय मंडळाकडे जामिनासाठी अर्ज करावा लागताे. त्यानंतर बाल न्याय मंडळापुढे त्याचा खटला सुरू हाेताे. साक्षीपुरावे बघून बाल न्याय मंडळ त्याच्या जामीनावर निर्णय घेते.
 
शहरातील बालगुन्हेगारी आकडे
वर्ष - दाखल गुन्हे - बाल गुन्हेगार
2023 254 - 373
2024 283 - 351
2025 (ऑक्टाेेबर) 49 - 70
पालकांचे पाल्यांकडे दुर्लक्ष, व्यसन यामुळे बालगुन्हेगारीत वाढ हाेत असते. व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर अनेक मुले वाम मार्गाकडे वळतात. बालगुन्हेगारी राेखण्यासाठी पाेलिसांनी विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्यामध्ये ‘ऑपरेशन थंडर’ची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे बालगुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पाेलिसांना यश आले आहे.
- नवीनचंद्र रेड्डी (सहपाेलिस आयुक्त, नागपूर पाेलिस)