वॉशिंग्टन,
Donald Trump's health is in the news अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आले आहेत. नुकतीच त्यांची मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्याविषयी विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. व्हिडिओतील काही दृश्यांमध्ये ७९ वर्षीय ट्रम्प थकलेले, घामाने भिजलेले आणि किंचित अस्वस्थ दिसत असल्याचे प्रेक्षकांनी नमूद केले.
डाव्या विचारसरणीचे राजकीय विश्लेषक हॅरी सिसन यांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एक्स (माजी ट्विटर) वर लिहिले आहे की , ते पूर्णपणे थकलेले आणि घामाने ओले दिसत आहेत. त्यांची बोलण्याची लय विस्कळीत आहे. निश्चितच त्यांची तब्येत बरी नाही! काही वापरकर्त्यांनी तर असा तर्क मांडला की ट्रम्प यांनी चेहऱ्यावर बोटॉक्स इंजेक्शन घेतले असावे.
ही पहिलीच वेळ नाही की ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मलेशिया भेटीदरम्यानही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त झाली होती. २६ ऑक्टोबर रोजी क्वालालंपूर येथे झालेल्या आसियान शिखर परिषदेत ट्रम्प यांचे सूजलेले टाच स्पष्ट दिसून आले. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत बसताना त्यांची पँट थोडी वर गेली आणि त्यांच्या पायातील सूज कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यक अधिकारी शॉन बार्बरेला यांनी अलीकडेच तपासणी करून ट्रम्प यांची तब्येत स्थिर आणि समाधानकारक असल्याचे सांगितले.