रिसोड,
drug stash seized जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या रिसोड शहरातील अमरदास नगर परिसरात २ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी एका धाडसी कारवाईत अमली पदार्थ, गांजा आणि लाखो रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही धाडसी कारवाई केली. अंदाजे १८ ते २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, रिसोड शहरातील अमरदास नगर भागात एका ग्रे रंगाच्या बलेनो कारबद्दल पोलिसांना संशय आल्याने, गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड आणि मालेगाव पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने लगेच घटनास्थळी धाड टाकली. यावेळी कारची कसून तपासणी केली असता, यामध्ये एमडीएम सारखा दिसणारा पांढरा पदार्थ, गांजा आणि मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा गठ्ठा आढळला.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात ६० ग्रॅम वजनाचा एमडीएम (मेथिलिनडाइ ऑसिमेथेमफेटामाइन) सारखा पांढरा पदार्थ, सुमारे २ किलो गांजा, ३७८ पाचशे रुपयांच्या बनावट नोटा एकूण किंमत सुमारे १ लाख ८९ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली ग्रे रंगाची बलेनो कार, दोन मोबाईल फोन आणि अन्य साहित्य जप्त केले असून, संपूर्ण मुद्देमालाची किंमत अंदाजे १८ ते २० लाख रुपये इतकी आहे. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.drug stash seized पुढील प्रकरणाचा तपास रिसोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या संवेदनशील प्रकरणाचे धागेदोरे केवळ रिसोडपर्यंत मर्यादित नसून राज्याबाहेरील काही मोठ्या व्यक्तींशी जोडले गेले असण्याची शयता पोलिसांनी वर्तवली आहे.